बार्शिटाकळी तालुक्यात शिवारफेरीचे नियोजन

 बार्शिटाकळी तालुक्यात शिवारफेरीचे नियोजन


अकोला, दि. ४ : मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्यासाठी बार्शिटाकळी तालुक्यात १५९ गावामध्ये शिवारफेरी घेण्यात येणार आहे.

मृद व जलसंधारणाचे ३९ प्रकाराच्या कामांचे मॅपिंग  करण्यात येणार आहे. याकरी ता तालुकास्तरावर सदर कार्यक्रमाचा आराखडा लवकरात लवकर तयार करण्याकरिता आढावा बैठकीचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार आज दि. ४ एप्रिल रोजी मुर्तीजापुर येथील उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष संदीपकुमार अपार यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरीता मुर्तीजापुर येथे आढावा बैठक पार पडली. 
सदर बैठकीस उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन वानरे, बार्शिटाकळी तहसिलदार राजेश वजीरे, बार्शिटाकळी गटविकास अधिकारी आर. पी. पवार, पाटबंधारे उपविभागीय अधिकारी अनिल राठोड, जलसंधारण अधिकारी  श्याम वाकपांजर, विस्तार अधिकारी रोहीदास भोयर, लघु पाटबंधारे (जि.प बार्शिटाकाळी) मनिष पाटील व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत अध्यक्ष यांनी बार्शिटाकळी तालुक्यातील विविध विभागांतर्गत मृद व जलसंधारणाचे करण्यात असलेल्या कामांचे मॅपिंग आणि प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्याकरीता गावनिहाय शिवारफेरी घेऊन ३१ मे २०२५ पर्यंत कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने