सत्यशोधक चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर यांना नुकताच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अवार्ड जाहीर झाला असून निलेश जळंमकर यांनी गेल्या दहा वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव काम केले आहे. त्यांनी पथनाट्यापासून ते महानाट्य पर्यंत लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती केलेली आहेत त्यांनी आपल्या विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून सिने सृष्टीतील दिग्गज कलावंतांसोबत इथल्या स्थानिक कलावंतांना सुद्धा संधी उपलब्ध करून दिलेली आहे 2010 मध्ये डेबू देव तेथेची जाणावा या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये पहिले पाऊल टाकले त्यानंतर महानायक नागपूर अधिवेशन आसूड यासारख्या दर्जेदार चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे 2024 मध्ये प्रदर्शित झालेला महात्मा फुलेंच्या जीवनावरील सत्यशोधक या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत आता नुकत्याच जाहीर झालेल्या अंबरनाथ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक परीक्षक पुरस्कार त्यांना जाहीर झाला या पुरस्कार सोहळ्याचे वितरण मुंबई येथे दिमागदार सोहळ्यात 20 एप्रिल 2025 ला होणार आहे तिथे चित्रपट व राजकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत त्यांचे हे यश अकोल्याच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे ह्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
निलेश जळमकर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा पुरस्कार जाहीर
byAkola Times
-
0
